पंढरपूर – पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाला सकाळी सुरूवात झाली आहे. एकूण 524 मतदार केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत 6 पूर्णांक 42 टक्के मतदान झाले, तर 3 हजार 289 मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधनानंतर विधानसभेची जागा रिक्त झाल्याने या विधानसभा मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असून भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलं आहे.
वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढतही भालके आणि आवताडेंमध्येच होणार आहे. अत्यंत चुरशीच्या या लढतीत कोण जिंकणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्यात सरळ लढत मतदारसंघात बघायला मिळत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे.
दरम्यान, आज भगीरथ भालके यांनी आपल्या कुटुंबियांच्या सोबत मतदानाचा हक्क बजावला.पंढरपूर शहरातील सांगोला चौक येथील नगरपालिका शाळा क्रमांक 9 येथे त्यांनी मतदान केले. यानंतर बोलताना ते म्हणाले,दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्यावर असणारे प्रेम व मतदार संघातील मतदारांचा विश्वास हाच आपल्याला विजयी करेल. यावेळी बोलताना त्यांनी कोरोना नियमांचे पालन करून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
महत्वाच्या बातम्या
- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, चुरशीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष
- प.बंगालमध्ये पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 853 तुकड्या तैनात
- ‘अजित पवार…तुम्ही आरोग्य व्यवस्था अगोदर नीट करा मग लॉकडाऊनची धमकी द्या’
- रेमडेसिव्हिरचा काळाबाजार! घाटीतील कर्मचारी, मेडिकल चालकासह तिघे अटकेत
- पैठणमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी


