उस्मानाबाद: महाराष्ट्र शासनाने महाआवास अभियान अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यास दिलेल्या उद्दिष्ट पूर्तीमध्ये उस्मानाबाद जिल्हा मराठवाड्यात प्रथम आला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे व त्यांच्या टिमचे कौतूक केले आहे.
महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेकरिता उस्मानाबाद जिल्ह्यास १५२५१ घराचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे होते. रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना अशा विविध योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचा वारंवार पाठपुरावा करून प्रकल्प संचालक श्री. नवाळे, जिल्हा व तालुका स्तरावरील काम करणारे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांचे कौतुक करण्यात आले.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे व त्यांच्या टिमचे कौतूक केले आहे. या योजनेत लाभार्थ्यांचा वारंवार पाठपुरावा करून प्रकल्प संचालक श्री. नवाळे, जिल्हा व तालुका स्तरावरील काम करणारे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांचे कौतुक करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- लातूर जिल्ह्यात शुक्रवारी २० जणांचा मृत्यू; १७६७ पॉझिटिव्ह रुग्ण
- प.बंगालमध्ये पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 853 तुकड्या तैनात
- ‘अजित पवार…तुम्ही आरोग्य व्यवस्था अगोदर नीट करा मग लॉकडाऊनची धमकी द्या’
- रेमडेसिव्हिरचा काळाबाजार! घाटीतील कर्मचारी, मेडिकल चालकासह तिघे अटकेत
- पैठणमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी

