Share

उस्मानाबादेत लाचखोर दुय्यम निबंधकासह तिघांना अटक, १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

Published On: 

उस्मानाबाद: मागील काही दिवसांपासून लाचखोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. खरेदी दस्त नोंदणीसाठी १० हजाराच्या लाचेची मागणी करून रक्कम स्विकारणाऱ्या कळंब येथील प्रभारी दुय्यम निबंधकास रंगेहात पकडण्यात आले तर लाचखोरीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या खाजगी चालकासह दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. कळंब येथे एसीबीच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. एसीबीच्या या कारवाईमुळे कळंब दुय्यम निबंधक कार्यालयातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला असून कोरोना संकट काळात देखील सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक व पिळवणूक कशी होते ते या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहे.

याबाबत एसीबीने दिलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार कळंब दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात जमीन, प्लॉट, घर खरेदी- विक्रीचे दस्त तयार करण्याचे काम करतात. तक्रारदार यांनी मोहा येथील पक्षकाराचे जमीन खरेदी खताचे दस्त बनविले होते. ते दस्त त्यांनी नोंदणीसाठी कळंब दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी दुय्यम निबंधक अमृत पांडुरंग बंडगर यांच्याकडे सादर केले. यावेळी प्रभारी दुय्यम निबंधक बंडगर यांनी १० हजाराची लाच मागितली.

याप्रकरणी तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यावरून एसीबीचे उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता. दरम्यान, प्रभारी दुय्यम निबंधक बंडगर यांनी गुरूवारी पंचासमक्ष दस्त नोंदणीसाठी १० हजाराची लाच मागितली. तसेच पक्षकार हे वयोवृद्ध असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने त्यांच्याकडून ही लाचेची रक्कम घेण्यास तक्रारदार यांना सांगितले. यावेळी शुक्रवारी ही रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदार पक्षकारास घेवून दुय्यम निबंधक कार्यालयाकडे गेले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!