Share

महाराष्ट्रातील परिस्थिती अधिक गंभीर, मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना २४ तासात ३ वेळा फोन

Published On: 

मुंबई : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल १ हजार ३४१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या ४ दिवसांपासून रोज देशभरात १ हजारहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांची आकडेवारी पाहाता देशभरात एकूण २ लाख ३४ हजार ६९२ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

महाराष्ट्रात देखील कोरोनाची स्थिती अधिक भयावह होत आहे. राज्यात काल (१६ एप्रिल ) ६३ हजार ७२९ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे तब्बल ५९ हजार ५५१ जणाचा कोरोनाने बळी घेतला आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत राज्याची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीरचा प्रचंड तुडवडा प्रत्येक जिल्ह्यात जाणवत आहे. रुग्ण बेड्स अभावी जीव सोडत आहेत. तर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी पळापळ करावी लागत आहे.

याच पार्शभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 24 तासात तब्बल तीनवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला 1200 ते 1500 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली. या दोघांमध्ये महाराष्ट्रातील आणि मुंबईतील ऑक्सिजनचा तुटवड्याबाबत चर्चा झाली.

काल मुंबईतील काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमरता होती. त्यामुळे काही रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले होते. त्यावरुनच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना फोन करुन, महाराष्ट्रातील चिंताजनक परिस्थिती कळवली.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!