Share

परतूरमध्ये दिवसाढवळ्या डोळ्यात मिरची पूड टाकून दोघांना लुटले

Published On: 

जालना: जिल्ह्यात कोरोनामुळे नागरिक हैराण आहेत त्यातच चोऱ्या आणि लुटमारांचे देखील प्रमाण मोठ्या प्रमणात वाढले असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील परतूर येथे दिवसाढवळ्या चोरांनी दोन मुनिमांना लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परतूर तालुक्यातील व्यापाऱ्यांकडील रक्कम वसूल करून जालना येथील वर्धमान ट्रेडर्स या होलसेल किराणा आणि ड्रायफ्रुट दुकानाचे दोन मुनीम कारद्वारे जालन्याकडे येत होते तेव्हा त्यांची कार मध्येच अडवून त्यांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

जालन्याकडे परतत असतना मुनिमांच्या कार मागून भरधाव आलेल्या कारने चिंचोली पुलावर त्यांच्या कारपुढे गाडी थांबवून लोखंडी रॉडने कारच्या काचा फोडल्याने चालक बाहेर आला. याचवेळी पाच चोरट्यांनी कारमधील मुनीमांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील ९ लाखांची रोकड पळवून नेली. मुनीम कपील जैस्वाल यांनी सदर प्रतिनिधीला ही माहिती दिली. हा थरार शुक्रवारी (दि.१४) दुपारी २ च्या सुमारास परतूर – सेलू रस्त्यावरील चिंचोली पुलाजवळ घडला.

जालना येथील वर्धमान ट्रेडर्स या होलसेल किराणा आणि ड्रायफ्रुट दुकानाचे राजु शर्मा आणि कपील जैस्वाल हे दोन मुनीम इजिन्स कारमधून परतूर तालुक्यातील सातोना येथे व्यापाऱ्यांकडील येणी वसुल करण्यासाठी गेले होते. येणी वसुल करून चालक दयानंदमामा आणि हे दोघे परतूर – सेलू रस्त्यावरून जालन्याकडे येत असताना चिंचोली पुलाजवळ त्यांच्या पाठीमागून आलेल्या भरधाव व्हिस्टा कार ओव्हरटेक करुन त्यांच्यापुढे आली व थांबली.

कारमधून पाच जणांनी खाली उतरून लोखंडी रॉडने कारच्या काचा फोडल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चालक बाहेर आला. त्यावेळी या पाचही जणांनी सोबत आणलेली मिरचीची पूड डोळ्यात टाकून त्यांच्याकडील ९ लाख रूपयांची रक्कम घेवून धूम ठोकली. या घटनेनंतर सेलूच्या दिशेने कारचा पाठलाग करण्यात आला. परंतु कार भरधाव वेगाने निघून गेली होती. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून सदर वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काही वेळानंतर नगरसेवक राजेश खंडेलवाल यांची दुचाकीही चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. खंडेलवाल यांनी सीसीटीव्हीचे फुटेज देत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!