🕒 1 min read
औरंगाबाद:पंतप्रधान नरेंद्र मोदींवर(Narendra Modi) बोलण्याइतके नाना पटोले मोठे नाही. काँग्रेसच्या राजकारणात पागलांची मोठी फौज आहे. पंतप्रधानांवर बोलण्या इतके पटोले मोठे नाही. नाना पटोलेंमुळे(Nana Patole) महाराष्ट्रातील काँग्रेस बदनाम झाली आहे. असा आरोप भाजप शहरजिल्हाध्यक्ष संजय केनेकरांनी केला आहे. तसेच त्यांची मला कीव येते. आम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मात्र काँग्रेसला सद्बुद्धी मिळो. पंतप्रधान मोदींसोबत जे घडले त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही. असा इशाराही त्यांनी केला.
यावेळी बोलतांना पुढे ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबमध्ये ४० हजार करोड रुपयांचे विकासात्मक कार्याचे उद्घाटन व लोकार्पण करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. परंतु काँग्रेस शासित सरकार व नेते पंजाब मध्ये असल्यामुळे त्यांनी पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या वेळी जाणीव पूर्वक त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल याप्रकारचे कृत्य केले. पंतप्रधान ज्यावेळेस हुसेनीवाला येथील शहीद स्मारकला अभिवादन करण्यासाठी जात होते, त्या वेळी जाणीवपूर्वक त्यांच्या रस्त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते घुसवण्यात आले.
त्यांचा रस्ता आडवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य केले. या षडयंत्रामध्ये दिल्ली मधील काँग्रेसचे नेते हे पडद्याआडून सहभागी असतील असा थेट आरोप औरंगाबाद मधील आक्रमक भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. काँग्रेस आज जनतेमधून नामशेष झालेली आहे. त्यांच्या दृष्टीने नरेंद्र मोदी हे त्यांचे कर्दनकाळ ठरले. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या बाबतीत बरेवाईट करण्यासाठीच अशा प्रकारचे षड्यंत्र केले जात असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसांची तत्परता! ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवले; पाहा व्हिडिओ
- महेश शिंदेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर;म्हणाले…
- “महापौर मॅडम तुमचं सरकार… तुमचा पेपर नेहमीच फुटलेला असतो”, सदाभाऊंची घणाघाती टीका
- हृतिक पुन्हा लग्न करणार? सुझानला घटस्फोट दिल्यानंतर वडील राकेश रोशन यांचा खुलासा
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची आज उच्चस्तरीय बैठक; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांच्या मंत्र्यांची राहणार उपस्थिती

