Share

मध्य प्रदेशमध्ये VHP च्या रॅलीवर दगडफेक करणाऱ्यांची घरं प्रशासनाने पाडली

Published On: 

🕒 1 min read

उज्जैन:- मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील बेगमगड परिसरामध्ये संघ परिवाराने आयोजित केलेल्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणानंतर येथील प्रशासनाने ज्या झोपडपट्टीमधून ही दगफेक करण्यात आली तेथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे.

शुक्रवारी समग्र हिंदू समाज, भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या उभारणासाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाखाली एका रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र ही रॅली बेगमगड येथे आली असता येथील काही घरांमधून रॅलीवर दगडफेक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या परिसरातील काही घरांमधील महिलांनाही रॅलीमधील लोकांवर आणि दुचाकीस्वारांवर दगड आणि विटांचा मारा केल्याचे दिसून आलं. रॅलीवर झालेल्या दगडफेकीमध्ये रॅलीतील अनेक कार्यकर्ते जखमी झाले.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या या महिला कारवाई करण्यात आलेल्या घरामध्ये राहत होत्या असं टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र ही कारवाई पूर्वनियोजित असल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला आहे.

दगडफेक करणाऱ्यांच्या घरावर केलेल्या कारवाईच्या वृत्तावर ट्विटवरुन प्रितिक्रिया देताना भजपा नेते तेजेंदर पाल सिंग बग्गा यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं कौतुक केलं आहे. “शिवराज मामा फॉर्म में है ,” असं त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!