Share

Winter Session 2022 | तुम्हाला सरकारमध्ये संधी हवी का? विधानसभेत फडणवीसांचा सुनील प्रभूंना सवाल

Published On: 

🕒 1 min read

Winter Session 2022 | नागपूर : विधानसभेचे हिवाळी अधिवेशनआजपासून नागपूरमध्ये सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विधान भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थाने असलेल्या ‘रामगिरी’ आणि ‘देवगिरी’ येथेही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगला. यावेळी ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी नागपूरमध्ये सत्ताधाऱ्यांच्या बंगल्याचा रंगरंगोटीचा मुद्दा मांडला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

सुनील प्रभू म्हणाले, विद्यमान सरकारमध्ये सद्यस्थितीमध्ये एकही राज्यमंत्री नसताना नागपूर अधिवेशनामध्ये राज्यमंत्र्यांचे सगळे बंगले सजवले गेले. ज्या बंगल्यांची आता आवशक्यता नाही. ते बंगले सजवले गेले आहेत. एक प्रकारे सरकार प्रकल्पासाठी करोडो रुपयाचे कर्ज उभे करते. ते प्रकल्प पूर्ण केले पाहीजे. पण ही सरकारी पैश्याची उधळपट्टी आहे.

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही अधिवेशनाच्या काळात देखील बंगले सजवू शकतो. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तुम्हाला( सुनील प्रभू) संधी हवी आहे का?. अधिवेशनाच्या निमित्ताने रंगरंगोटी केली जाते. कोट्यावधी वैगरे खर्च केले नाहीत. त्याचा हिशोब आम्ही पाठवून देतो.”

दरम्यान अधिवेशन सुरु होण्याच्या काही वेळापूर्वीच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ५० खोके एकदम ओके, अशा घोषणा दिल्या. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच यावेळी देखील ५० खोक्यांच्या मुद्यांवरुन विरोधक आक्रमक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी देखील आक्रमक होण्याची चित्र दिसत आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वक्तव्य आणि कर्नाटकसोबतच्या सीमावादाच्या मुद्द्यावरून नागपुरात आजपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. फॉक्सकॉनसारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यावरून विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!