Share

Winter Session 2022 | 50 खोके एकदम ओके, विधानसभेत पुन्हा झळकले बॅनर

Published On: 

🕒 1 min read

Winter Session 2022 | नागपूर : विधानसभेचे हिवाळी अधिवेशनआजपासून नागपूरमध्ये सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विधान भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थाने असलेल्या ‘रामगिरी’ आणि ‘देवगिरी’ येथेही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

दरम्यान अधिवेशन सुरु होण्याच्या काही वेळापूर्वीच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ५० खोके एकदम ओके, अशा घोषणा दिल्या. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच यावेळी देखील ५० खोक्यांच्या मुद्यांवरुन विरोधक आक्रमक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी देखील आक्रमक होण्याची चित्र दिसत आहेत.

यापूर्वी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्राच्या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा आणणार आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रीही या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना यासंदर्भात विधेयक मांडण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्यात संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी नवीन (सुधारित) कायदा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वक्तव्य आणि कर्नाटकसोबतच्या सीमावादाच्या मुद्द्यावरून नागपुरात आजपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. फॉक्सकॉनसारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यावरून विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!