Share

“…अन् आरोप करायचे पत्रकारांसमोर”, राऊतांच्या पत्रकार परिषदेवर भातखळकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल (७ मार्च) ट्वीट करत राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. आज चार वाजता शिवसेना भवनात शिवसेना पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टोला लगावला आहे.

“संजय राऊत पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत असे समजते. विश्वास व्यक्त करायचा राज्याच्या पोलिसांवर, पुरावे द्यायचे PMO ला आणि आरोप करायचे पत्रकारांसमोर ऐसा कैसे चलेगा?”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान कालच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आणि त्यानंतर लगेच राऊतांनी पत्रकार परिषदेची घोषणा केली. त्यामुळे संजय राऊत उद्या नवाब मलिक यांच्याबाबत काही खुलासा करणार का, अशा चर्चा आता केल्या जात आहेत. दरम्यान २३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना ७ मार्चपर्यंत ईडीने कोठडी सुनावली. तद्पश्चात आता विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अवघ्या काही वेळातच संजय राऊत यांनी शिवसेना पत्रकार परिषदेची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ते पुन्हा एकदा काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!