मुंबई : सलमान खानला मिळालेल्या धमकीमुळे पोलिसांनी तिहार तुरुंगामध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली. या चौकशीमधून महत्वाची बातमी समोर येत आहे. सलमान खान आणि त्याचे वडील यांना मी धमकीचे कोणतेही पत्र पाठवले नाही. अशी माहिती लॉरेन्स बिश्नोईने दिली आहे. २०१८ मध्ये मी सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती पण आता मिळालेल्या पत्राशी माझा काहीही संबंध नाही असं लॉरेन्सने स्पष्ट केले आहे.
५ जूनला सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. ‘तुझा सिद्धू मुसेवला करू’ असं त्या पत्रामध्ये लिहिलेल होते. यानंतर राज्य सरकारच्या गृह खात्याने त्यांची सुरक्षा वाढवली आहे. आणि त्यासंदर्भात अधिक चौकशी देखील सुरु केली आहे. काही दिवसापूर्वी सिद्धू मुसेवलाची हत्या करण्यात आली होती. आणि या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली होती.
नेमका कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईने दहशत माजवली आहे. २०१८ मध्ये जेव्हा त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती तेव्हापासून हा चर्चेत आलेला आहे. तो पंजाबच्या अबोहर भागात राहतो. लॉरेन्स कॉलेजमध्ये असताना निवडणुकीला उभा राहिला होता. पण निवडणुकीत पराभव झाल्यावर त्याने विरोधकांवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्याची गुन्हेगारी क्षेत्रात सुरवात झाली.
महत्वाच्या बातम्या :


