सांगली : सांगलीतील एका संघटनेने दारू घरपोच देण्याच्या संकल्पनेला प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. राज्यातील दारूविक्रीची दुकानं उघडल्यानंतर अनेक तळीरामांनी गर्दी करत लांबच लांब रांगा लावल्या. असेच चालू राहिले तर कोरोनाचा प्रसार आणि संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने विनामोबदला दारू घरपोच देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जनसेवा संघटनेने केली आहे.
याआधीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसेवा संघटनेने घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्रम केला होता. तर आताही त्यांनी विनामुल्य घरपोच दारू देण्याचा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला आहे. याबाबत जनसेवा संघटनेचे शंभू काटकर म्हणाले की, देशी दारूच्या दुकानावर तर सहाशे सातशे लोक एकमेकाला खेटून उभे असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. असेच सुरू राहिले तर सांगली संकटात सापडायला फार वेळ लागणार नाही. जिल्हा प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी जनसेवा संघटनेने केली आहे.
वास्तविक मद्य विक्रेत्यांना मागणीनुसार त्यांच्या परिसरात पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे नियोजन उत्पादन शुल्क विभागाने करायला हवे होते. त्यांना जर ते शक्य नसेल तर महापालिका क्षेत्रात जनसेवा भाजीपाला संघटनेच्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गाड्या फिरत आहेत ते मोबदला न घेता केवळ कोरोना रोखण्यासाठी सेवा द्यायला तयार आहेत.
दरम्यान जनसेवा संघटना लोकांना सामान्य दरामध्ये भाजी घरपोच करण्याची सोय प्रशासनाने परवानगी दिलेल्या 111 भाजीपाला वाहनांद्वारे करीत आहे. तर आता प्रशासनाने दारू घरपोच देण्याच्या प्रस्तावावर निर्णय देऊन दारूसाठी होणारी गर्दी टाळावी, अशी जनसेवा संघटनेची मागणी आहे.
महत्वाच्या बातम्या
न्यायव्यवस्था ही काही श्रीमंत-शक्तीशाली लोकांच्या मुठीत : न्यायमूर्ती गुप्तांंचे रोखठोक विधान
औरंगाबाद येथील घटनेची PM मोदींनी घेतली दखल, तर रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केली हळहळ
‘लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या, गावी जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

