Share

चीनने गंभीर चूक केली आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेसिडेंट ट्रम्प पुन्हा भडकले

Published On: 

🕒 1 min read

अंतरराष्ट्रीय : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चीनवर निशाणा साधला आहे. चीनच्या चुकीमुळेच आज संपूर्ण जगाला कोरोनाची लागण झाली आहे. ‘करोना व्हायरसच्या विषयात एकतर चीनकडून भयंकर चूक झाली आहे किंवा ते असमर्थ आहेत’ अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टीका केली आहे.

व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, या घटनेला दोनबाजू आहेत. एकतर त्यांनी गंभीर चूक केली असावी किंवा ते असमर्थ आहेत. कोणी तरी मूर्खपणा केला, त्यांनी त्यांचे काम व्यवस्थित केले नाही. हे खूप वाईट आहे.

जगभरात ३७ लाख लोकांना करोना व्हायरसची बाधा झाली आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत २ लाख ६४ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकटया अमेरिकेत ७५ हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. १२ लाख लोकांना लागण झाली आहे. १८० पेक्षा जास्त देशांमध्ये हा धोकादायक व्हायरस पसरल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

दरम्यान कोरोनामुळे अमेरिकेचे देखील मोठे नुकसान झाले असून यामुळेच अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर सध्या चीन आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आणखी खळबळजनक आरोप केला आहे. आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माझा पराभव व्हावा, मी पुन्हा निवडून येऊ नये म्हणून चीन काहीही करू शकतो,” असा दावा ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

महत्वाच्या बातम्या

कोरोना टाळण्यासाठी सांगलीतील एका संघटनेची दारू घरपोच देण्याची तयारी

न्यायव्यवस्था ही काही श्रीमंत-शक्तीशाली लोकांच्या मुठीत : न्यायमूर्ती गुप्तांंचे रोखठोक विधान

औरंगाबाद येथील घटनेची PM मोदींनी घेतली दखल, तर रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केली हळहळ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!