बीड : बुधवारी मुंबई येथे मंत्रालय परिसरात आष्टी येथील विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांची समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याशी अचानक भेट झाली. यावेळी धस यांना भेटताच सिंधूताईंनी त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवत त्यांच्या कार्याचे कौतूक केले.
https://www.facebook.com/mlasureshdhas/posts/2864065993849151
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धस यांनी याबाबत माहिती दिली. पोस्टमध्ये धस यांनी लिहिले आहे की, ‘अरे सुरेश तू आणि मी खुप संघर्षातून आलेलो आहोत बघ., तू ऊसतोड्यांचा आधार होऊन काम करतोस, एक लक्षात ठेव ऊसतोड मजुरांची मुलं शिकून उच्च शिक्षित झाली पाहिजेत.
यासाठी तु प्रयत्न कर आणि साखर कारखान्यावर महिला व मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत’. सिंधूताईंनी ऊसतोडणी कामगार महिलांच्या खुप हालअपेष्टा होतात. त्यासाठी काहीतरी कर असेही शेवटी सांगितले.
दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशना धस यांनी विविध प्रश्नांवरून महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि कोरोनाशी लढताना अपयशी ठरलेले सरकार यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. त्यांनी अभ्यासपुर्ण परंतु आपल्या नेहमीच्याच आक्रमक व रांगडया शैलीत भाषण करीत या भागातील विविध विषय मांडून सभागृहाचे लक्ष वेधले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- बीड जिल्हा नियोजन समितीच्या निवडीतून महिलांना वगळले
- मामाच्या घरी लग्नासाठी आलेली दोन मुले कालव्यात बुडाली
- तेरणा कारखाना; शिष्टमंडळ केंद्रिय मंत्र्यांना भेटले, अनामत रकमेतून पीएफ भरण्याचा पर्याय
- ‘शुभंमगल’साठी जाताना सावधान! आधार कार्डाशिवाय वऱ्हाडीनांही ‘नो एन्ट्री’
- महावितरणच्या मदतीला बळीराजा आला धावून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

