Share

“१० देवस्थानांच्या जमिनी भाजप नेत्यांनी हडप केल्या”; नवाब मालिकांचा खळबळजनक आरोप

Published On: 

औरंगाबाद : भारतीय जनता पक्ष भगवान श्रीरामाच्या नावाने राजकारण करतो. मात्र त्याच पक्षाचे नेते प्रभू रामचंद्रांच्या आणि विठोबाच्या नावाने असलेल्या जमीनी हडप करत आहेत. १० देवस्थानांच्या जमिनी भाजप नेत्यांनी हडप केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस(Suresh Dhas) आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नावाचा समावेश असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तीन मुस्लिम देवस्थाने आणि सात हिंदू देवस्थानांच्या ५१३ एकर जमिनीच्या कागदपत्रांत फेरफार करुन त्यावर खासगी नाव चढवले. तसेच त्याचे प्लॉटिंग करुन हजारो कोटींचा घोटाळा करण्यात आला. राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील नेते राम खेडे यांनी आष्टी तालुक्यातील दहा देवस्थानांचा जमिन घोटाळा समोर आणला असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. यात मशीद आणि दर्गा इनामच्या तीन देवस्थानांच्या २१३ एकर जमिनीचा समावेश आहे.

त्याचबरोबर मुर्शीदपूर येथील विठोबा देवस्थानची ४१ एकर ३२ गुंठे, खंडोबा देवस्थान ३५ एकर, श्रीराम देवस्थान २९ एकर, कोयाड येथील श्रीराम देवस्थान १५ एकर, चिंचपूर रामचंद्र देवस्थान ६५ एकर, बेळगाव खंडोबा देवस्थान ६० एकर आणि खडकत विठोबा देवस्थान ५० एकर अशी हिंदू देवस्थानांची ३०० एकर जमीन खालसा करण्याचे काम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले. अशी एकूण ५१३ एकर जमीन खालसा केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. २०१७ सालापासून हा उद्योग सुरु असल्याचे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!