औरंगाबाद:औरंगाबादेतील एक व्यक्ती मुंबईत ओमायक्रोन पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर इंग्लंड वरून आलेल्या कुटुंबातील एक सदस्य मुंबई या ठिकाणी उपचार घेत आहे. तर याच कुटुंबातील एका व्यक्तीच्या अहवालाची सध्या प्रतीक्षा केली जात आहे. त्यामुळे औरंगाबादवर ओमायक्रॉनचे संकट घोंगावत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने टास्क फोर्सची बैठक बोलावत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये कोरोना बाधितांसाठी सुरू करण्यात आलेली होम आयसोलेशन सुविधा आता पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.
जिल्हा प्रशासनाने सोमवारी तातडीने टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. यामध्ये आता यानंतर जिल्ह्यातील कोणत्याही कोरोनाबाधिताला आता घरी उपचार घेता येणार नाही. शासकीय किंवा खाजगी कोविड सेंटरमध्ये त्यांना दाखल व्हावे लागणार आहे. अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या आहेत. त्याच प्रमाणे प्रत्येक खाजगी रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणीची सोय करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत.
या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या ननिर्णयांमध्ये विनामास्क फिरणार्या नागरिकांना दंड ठोठावणे, खाजगी रुग्णालयात आरटीपीसीआर तपासणीची सक्ती, लसीकरणाचे प्रमाण वाढवणे, त्याचप्रमाणे विनामास्क वाहनधारकांवर कारवाई करणे, त्याचप्रमाणे परिवहन विभागामार्फत नोटीस बजावणे. हे महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत त्याचप्रमाणे माओयक्रोनची तपासणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली जिनोम सिक्वेन्सींग लॅब औरंगाबादेत असायला हवी यासाठी या प्रयोगशाळेचा प्रस्ताव घाटीने तयार करुन तो शासनास पाठवावा असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- “कुंपणच शेत खात असेल तर…” पेपरफुटीवरुन दरेकरांचा घणाघात
- सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत ‘KGF Chapter 2’ अव्वल स्थानी
- वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीवर माजी खेळाडूची प्रतिक्रिया
- “ज्वलंत हिंदुत्व UPA च्या दावणीला…” भाजपाची शिवसेनेवर खोचक टीका
- “बरं झालं असतं मुख्यमंत्र्यांसारखं…” ; सदाभाऊ खोतांनी घेतली फिरकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

