Share

औरंगाबादेत लॉकडाऊन काळात गावी गेलेले मजूर परतलेच नाही, मनपाचे तब्बल अडीच हजार विद्यार्थी गायब!

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी परतले होते. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतरही अजूनही अनेक जण परतलेले नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारी त्यांची मुलेही गायब आहेत. शिक्षकांनी अनेक मुलांचा शोध घेतला असता एकूण अडीच हजार विद्यार्थी गायब असल्याची माहिती समोर आली आहे. त्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवायचे की पुढील वर्गात टाकायचे याबाबत शिक्षक संभ्रमात सापडले आहेत.

औरंगाबाद मध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. या काळात सर्व व्यवहार बंद झाले होते. यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली. त्यामुळे परप्रांतातून कामधंद्याच्या निमित्ताने आलेल्या अनेकांनी त्या काळात औरंगाबाद सोडले. असंख्य परप्रांतीय कामगार आपापल्या गावी निघून गेले. सोबतच त्यांची मुले देखील निघून गेली. गावाकडे जात असताना शाळा बंद होत्या. आता देखील शाळा बंद आहेत.

मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. औरंगाबाद पालिकेने शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणा दरम्यान परप्रांतातील विद्यार्थी गायब असल्याचे लक्षात आले. याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिळाली. यामध्ये सुमारे अडीच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा पत्ताच लागला नाही.

त्यांच्या आई-वडिलांचा ही पत्ता मिळत नसल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांनी याबाबत चौकशी केली असता हे सर्वजण परप्रांतीय होते आणि हे लोक आपापल्या गावी निघून गेल्याचे समजते. यामध्ये चिकलठाणा, नारेगाव, पडेगाव, सातारा, देवळाई, सादात नगर, जटवाडा, बेगमपुरा, रोशन गेट, कटकट गेट या भागात मजूर जास्त संख्येने राहतात. ते आता औरंगाबाद सोडून दिल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!