Share

औरंगाबादेत आता केवळ अकरा वाजेपर्यंतच मिळणार पेट्रोल!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सिडको एन-१ सरदार सिंग अँड सन्स पेट्रोल पंपाला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने शुक्रवारी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दुपारी एक पर्यंत पेट्रोल पंप सुरू ठेवण्याचे नियम असतांना आणि नेमके कोणत्या नियमांचे उल्लंघन केले हे न सांगताच कारवाई करण्यात आली. त्यामुळे शनिवारपासून केवळ सकाळी सात ते अकरा या वेळेत शहरातील पेट्रोल पंप सुरू राहतील. त्यानंतर पंप बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोलियम डीलर असोसिएशन तर्फे घेण्यात आल्याची माहिती सचिव अखिल अब्बास यांनी दिली.

या कारवाई विषयी असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, आज सरदार सिंग अँड सन्स पेट्रोल पंप चालकावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २५ हजारांचा दंड लावण्यात आला. मुळात ही कारवाई अकरा वाजेदरम्यान करण्यात आली यात नेमका कोणत्या नियमांचा भंग केला त्याचा उल्लेख दंडाच्या पावतीत नाही.

१७ एप्रिलला दिलेल्या नियमावलीत पेट्रोल पंप एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक वाजेनंतर केवळ अत्यावश्यक सेवांना सूट आहे. हा दंड एक वाजेपूर्वीच करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी पंप सुरू ठेवण्याची निश्चित वेळ सांगावी. गर्दी होऊ नये यासाठीचे आम्ही काळजी घेत कोणताही गोंधळ होऊ देत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कारवाई होत असेल तर आम्ही अकरा वाजेपर्यंत पंप सुरु ठेवू. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मात्र पेट्रोल देण्यात आल्याची माहिती असोसिएशन तर्फे देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!