Share

औरंगाबादेत एकीकडे नवीन रस्ते तर दुसरीकडे खड्डयांवर ‘पॅचवर्क’च्या नावाखाली ५७ लाखांचे ठिगळ!

Published On: 

औरंगाबाद : कुठल्याही शहराचा विकास हा तेथील रस्त्यांवरुनच समजतो. मात्र औरंगाबाद शहरातील रस्ते विकासाची साक्ष देतात. औरंगाबाद कि संभाजीनगर यातच नागरिकांची दिशाभूल सुरु असून रस्त्यांची दुर्दशा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य शासनाने दिलेल्या १५२ कोटींच्या निधीत महापालिकेच्या वाट्याला नऊ रस्ते आले आहेत. त्यांची कामेही पूर्ण झाली आहे. मात्र अजूनही शहरातील कित्येक रस्ते गेली अनेक वर्षे डांबर पाणी न लागल्याने उखडले आहेत. पावसाळ्यात तर याठिकाणी मोठमोठे तळे झाले आहेत. आता मनपाने पॅचवर्कचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे झोन ४ आणि झोन ९ मधील पॅच वर्कच्या कामासाठी सुमारे ५७ लाख रुपयांच्या अल्पमुदतीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

जुन्या शहरात तर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे झाले आहेत. पावसाळ्यात तर या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. आणि येथून चालणे देखील अवघड होऊन बसते. मात्र मनपा प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे. अतिशय वर्दळीच्या रस्त्यांवर मोठमोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. खराब रस्त्यांमुळे वाहतूकीस ब्रेक लागतोच. त्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. एेतिहासिक दरवाजांच्या सुशोभीकरणाचे काम मनपाने हाती घेतले आहे. मात्र अनेक दरवाजांजवळ झालेल्या खड्डयांकडे आत्तापर्यंत पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.

शासनाद्वारे दिलेल्या निधीतून आतापर्यंत शहरातील अनेक नवीन रस्ते बनवण्यात आले आहेत . मात्र या जुन्या रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने महापालिकेने आता पॅचवर्कचा निर्णय घेतला आहे. झोन ४ आणि झोन ९ मध्ये पॅचवर्क केले जाणार आहे. झोन ४ आणि ९ मधील पॅच वर्कच्या कामासाठी २२ लाख ३१ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने झोन ४ मधील पॅचवर्कच्या कामासाठी एकूण ३५ लाख रुपये किमतीच्या तीन वेगवेगळ्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदा अल्पमुदतीच्या म्हणजे सात दिवसांच्या मुदतीच्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!