Share

अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज त्वरीत वितरीत करा – जेम्स अंबिलढगे

Published On: 

औरंंगाबाद : शासनाने अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासाठी १०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या वतीने गरजूंना त्वरीत कर्जाचे वितरण करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक तथा अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जेम्स अंबिलढगे यांनी केली आहे. तसेच अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला १ हजार कोटी रूपयांचा निधी द्यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

गेल्या काही वर्षापासून अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला पूरेशा प्रमाणात निधी न मिळाल्याने शेकडो बेरोजगार युवकांना कर्जापासून वंचित रहावे लागले आहे. राज्यशासनाने नुकतेच अण्णाभाऊ साठे महामंडळाला १०० कोटी रूपयांचा निधी दिला असून हा निधी अत्यल्प असल्याचे जेम्स अंबिलढगे यांनी यावेळी सांगितले. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने लाभाथ्र्यांना कर्ज देतांना ज्या जाचक अटी टाकण्यात आल्या असून त्या शिथील करण्यात याव्यात, लाभार्थ्यांना कर्ज देतांना हमीपत्राची टाकण्यात आलेली अट रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळाला १०० कोटी रूपये आणि इतर महामंडळांना १ हजार कोटी रूपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला असून शासन आमच्यासोबत दुजाभाव का करते असा प्रश्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तसेच इतर महामंडळाप्रमाणे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला देखील १ हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी जेम्स अंबिलढगे, सुरेश चव्हाण, रचना वाघ यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!