Share

पाकिस्तान विरुद्ध टी-२० मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, कर्णधारासह सात खेळाडूंचे पुनरागमन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसापुर्वी श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला होता. यानंतर पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडक्रिकेट बोर्डाने नव्या संघाची घोषणा केली.

इंग्लंडच्या या नवख्या संघाने पाकिस्तान संघाला धुळ चारत तीन सामन्यच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. यानंतर पाकिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा बुधवारी १४ जुलै रोजी करण्यात आली. यात पाकिस्तान विरुद्धच्या संघातील ४ खेळाडू वगळता ७ खेळाडुंनी पुनरागमन केले आहे. यात कर्णधार इयॉन मॉर्गनची पुन्हा एकदा कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

तर पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील डेव्हीड मलन, लेवीस ग्रेजॉय, मॅथ्यु पॅर्कीसन, जॅक बॉल हे खेळाडू संघात कायम आहे. तर एकदिवसीय मालिकेतील कर्णधार बेन स्टोक्सला पुन्हा संघाबाहेर करण्यात आले आहे. यासह जोस बटलर, मोईन अली, जॉनी बेअरस्टो यांचे पुनरागमन झाले आहे. येत्या १६ जुलै पासुन ही मालिका सुरु होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!