Share

‘त्या’ घेरावामुळे इम्तियाज जलील यांच्यासह २४ व्यापाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल

Published On: 

औरंगाबाद : शहरातील काही व्यापाऱ्यांच्या दुकानाला विविध कारणांमुळे प्रशासनाने सील लावले होते. त्याची सुनावणी लवकर घेऊन ते सील उघडण्यात यावे यासाठी खा.इम्तियाज जलील हे व्यापाऱ्यांसह कामगार उपयुक्तांना घेराव घेराव घालण्यासाठी गेले होते. याच दरम्यान झालेल्या खडाजंगीमुळे इम्तियाज जलील यांच्यासह २४ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, इम्तियाज जलील आणि काही व्यापारी सील उघडण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयात गेले. त्यांनी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांना घेराव घालत, सील उघण्यासाठी मागणी करू लागले. याच दरम्यान इम्तियाज जलील यांचा पारा चढला. त्यांनी पोळ यांना अरे तुरे करत, ‘तू दुकानाचे सील काढ, काय दंड आहे तो लगेच सांग’ असे म्हणत पोळ यांच्यावर दबाव टाकला.

त्यानंतर इम्तियाज जलील आणि व्यापारी तिथून निघून गेले. मात्र, कामगार उपायुक्त पोळ यांनी रात्री उशिरा क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठत. घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार दिली. त्यानुसार क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमविणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकाला दुखापत करणे, लोकसेवकांच्या आदेशाची अवहेलना, साथरोग प्रसाराची वर्तणूक करणे अशा प्रकारच्या कलमेसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!