जालना : लसीकरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये सुरु करणे शक्य नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यांनी जालना येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ३ हजार ७४ पदांची भरती पारंपरिक पद्धतीने होणार आहे. ही भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. संवर्गानुसार भरती करायची असेल तर आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागांनी निर्णय कळवल्यास त्यानुसार भरती करण्यास तयार असल्याचंही उदय सामंत म्हणाले. संस्थांच्या रोस्टर पद्धतीने निर्णय घेतला तर भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाची लागण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. त्यांच्या पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संपूर्ण फी माफ करण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आई/वडील किंवा दोन्ही पालकांचे निधन झाले असेल, अशा विद्यार्थ्यांचे पदवी वा पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याची घोषणा सामंत यांनी काल केली आहे. अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, महाविद्यालय पुस्तिका शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि महोत्सव अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च झालेला नाही, त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्कही माफ करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘..तर मग राष्ट्रवादीने धनंजय मुंडे आणि अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष का केले नाही?
- ‘मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका!’, थोरातांच्या कन्येला पडळकरांचे प्रत्युत्तर
- ‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामे करता का?’, हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापले
- ‘फडणवीसांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर कारवाई करा’, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढवण्याचा प्रयत्न’, जयंत पाटील यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

