Share

‘मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका!’, थोरातांच्या कन्येला पडळकरांचे प्रत्युत्तर

Published On: 

सोलापूर : शरयू देशमुख यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकरांनी सोलापुरात उत्तर दिलं. सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवण्याची गरज नाही. मी शिक्षकाचा मुलगा आहे. तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो का? असा सवाल पडळकरांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यासाबाबत केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांच्या घोषणेचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. ‘ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू, असंही म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर संन्यास घेईन म्हणतात; मात्र यापैकी काही झालं नाही’, असा टोला थोरात यांनी लगावला होता.

यावर पडळकर यांनी ट्वीट करून बाळासाहेब थोरात यांच्यावर बोचरी टीका केली होती. ‘महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

शरयू देशमुख यांचे ट्विट

https://twitter.com/SharayuDeshm/status/1409715517154160641

पडळकरांच्या या टीकेला आता बाळासाहेब थोरातांच्या कन्येनं सडेतोड प्रत्युत्तर देताना थेट त्यांचे संस्कारच काढले आहेत. ‘पात्रता पेक्षा जास्त मिळाले कि अस होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’ असं प्रत्युत्तर शरयू देशमुख यांनी ट्विटद्वारे दिलं आहे.

यानंतर आता पडळकर यांनी सोलापूर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांना प्रत्युत्तर दिलं. “काही घराणे अतिसुसंस्कृत आहेत. मी शिक्षकाचा मुलगा आहे. त्यामुळे मला सुसंस्कृतपणा माहिती आहे. तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो. मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका, असा हल्लाबोल पडळकरांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!