पंढरपूर : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यात पूर्ण बंद तसेच संचारबंदी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी कडक निर्बंध जाहीर केले.
सध्या दररोज रुग्णसंख्या वाढतच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लावले आहेत. यात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी आहे. पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत केवळ बारा तासच दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे केवळ बारा तासच खुले करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार विठ्ठल मंदिर प्रशासनाने शुक्रवारपासून सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवणार असल्याचे सांगितले आहे. तर ऑनलाईन दर्शन बुकिंगची मर्यादा आता मंदिर प्रशासनाकडून कमी केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावत, भर रस्त्यावर भरला बाजार!
- इंग्लंडचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
- ‘आता आपणच शासनाला मार्गदर्शन करावे’; प्रकाश मेहतांनी केली फडणवीसांना विनंती
- दीपाली चव्हाण प्रकरण : उपवनसंरक्षक शिवकुमारच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
- देवेंद्रजी… मोठ्या विकेट लूज बॉलवरच जातात ; संजय राऊतांची जोरदार फटकेबाजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

