पुणे : पुणे येथे झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली. या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जात आहे. पुण्याच्या एमसीए क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना पार पडत आहे. आजही दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज विजय नोंदवून मालिका खिशात घालण्याचा भारत पुरेपूर प्रयत्न करेन. तर पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न इंग्लंडची टीम करेल. इंग्लंडचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, थंगरासू नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही होणार विद्यापीठाच्या परीक्षा
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !


