Share

दीपाली चव्हाण प्रकरण : उपवनसंरक्षक शिवकुमारच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Published On: 

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिपालीला एक उच्चपदस्त वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपाली चव्हाण यांना त्यांनी झापल्याची माहिती आहे.

दिपाली यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाकला जाणारा दबाव व मानसिक त्रासाला कंटाळून दिपाली यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान,मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या दोषी अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबाची आणि वनपाल-वनरक्षक संघटनेने घेतली होती. यानंतर आता या प्रकरणात नागपुरातून अमरावती पोलिसांच्या पथकाने DCF  शिवकुमार यांना ताब्यात घेतले आहे.

शिवकुमार हे रेल्वेद्वारे प्रवास करत असल्याची माहिती मिळाली होती, पहाटेच्या सुमारास ते नागपूर रेल्वे स्थानकातून जाणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर अमरावती एलसीबी पथकाने नागपूर जीआरपीच्या कर्मचाऱ्यांसोबत मिळून शिवकुमार यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणाऱ्या आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने जीवन संपविल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

आता या घटनेनंतर भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. चव्हाण यांनी वांरवार DCF शिवकुमार संदर्भात केलेल्या तक्रारींवर वन संरक्षक रेड्डी यांनी कारवाई का केली नाही त्यांनी जर कारवाई केली असती तर दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. DCF शिवकुमार व वनसंरक्षक रेड्डी दोघांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!