Share

देवेंद्रजी… मोठ्या विकेट लूज बॉलवरच जातात ; संजय राऊतांची जोरदार फटकेबाजी

Published On: 

मुंबई : वडाळा विधानसभा मतदार संघात भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या तर्फे आमदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं . या आमदार चषकाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी फलंदाजी करत काही फटके देखील लगावले. क्रिकेटच्या मैदानात फटके लगावून झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राजकीय फटकेबाजी देखील केली.

‘मला बॅटिंग करायला मजा येते. लहानपणी मी बॅटिंग-बॉलिंग दोन्ही करायचो. फिल्डिंग कमी करायचो पण ज्यावेळी करायचो त्यावेळी कॅच सुटायचे नाहीत. मी बॉडीलाईन बोलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल ऑन द स्टम्प बोलिंग करतो. माझा शॉर्टपिचही बॉल नसतो. मात्र, माझ्या गोलंदाजीने समोरच्याला बॅटिंग करताना, अडचण येते,’ असा टोला देखील त्यांनी लगावला होता.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या ठिकाणी मला फटकेबाजी करायला मजा येते, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी लूज बॉलवर फटकेबाजी जरूर करावी. पण मोठ्या विकेट या लूज बॉलवरच जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. स्पिनर बॉलर कधी फास्ट चेंडू टाकत नाही. महाराष्ट्रात फक्त चंद्रशेखर भागवत हे एकटेच गुगली टाकायचे. बाकी गुगली गोलंदाज हे डुप्लिकेट आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!