Share

शरद पवारांच्या उपस्थितीत गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक; राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मुंबईत दोन महत्त्वाच्या बैठका झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आज सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली. विशेष म्हणजे तासभर झालेल्या या बैठकीत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे देखील उपस्थित होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून त्यानंतर दुपारी १ वाजता नवाब मलिक देखील पत्रकार परिषद घेणार आहेत.

दरम्यान, हे सर्व सुरु असतांनाच अचानक राऊतांनी पवारांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. तसेच त्यानंतर लगेच शरद पवार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थान गेले आणि तिथे गृहमंत्र्यांसोबतच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासोबत तासभर बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!