नागपूर : संजय राऊत (sanjay raut ) यांनी काल (२३ मार्च) सकाळी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. म्हणाले, आम्ही पंतप्रधान कार्यालयात आणि ईडीकडे सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे. मात्र, आमच्या पुराव्यांकडे कुणाचं लक्ष नाही.
पुढे म्हणाले, केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू आहे. परवा पाटणकरांवर कारवाई केली. त्या कारवाई मागचं सत्य काही तज्ज्ञ मंडळींनी समजून घ्यावं. हे नीट समजून घ्या. चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारीत केल्या जात आहेत. हळूहळू त्या गोष्टी बाहेर येतील. ही आमच्याविरोधातील बदनामीची मोहीम आहे. हीच मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही. मी पूर्ण विश्वासाने सांगतो हे तुमच्यावर उलटणार आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.
दरम्यान यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू आहे. त्याची चर्चा जगभर सुरू आहे. आमच्या सारखे लोक सुद्धा रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यातून वाचलोय, असा टोला लगावतानाच सध्या देशाचं वातावरण बदलून गेलंय.”
महत्वाच्या बातम्या:
- “CBI चौकशी झाली तर ‘मोठे साहेब’…”; भाजपचा शरद पवारांना इशारा
- … आणि बीसीसीआय अध्यक्ष ‘दादा’ ही पुष्पाच्या गाण्यावर थिरकला; VIDEO पहिला का?
- ‘…ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत” – राऊतांची फटकेबाजी
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ३१ मार्चपासून निर्बंधमुक्त देश
- “..यालाच मोदी सरकारची मुत्सद्देगिरी म्हणायचे काय ?”- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

