टीम महाराष्ट्र देशा : रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या तरुणीने बुधवारी आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीकरिता आदिवासी तडवी समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने जळगावात आंदोलन केले गेले. तसेच या प्रकरणी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात असून आरोपांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
दरम्यान,डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.चव्हाण म्हणाले की, आरक्षित जागेवर प्रवेश मिळवला म्हणून पायलला नेहमी जातीवाचक टोमणे मारले जात होते. याबाबत पायलने वारंवार तक्रार देखील केली होती, अशी माहिती आहे. असे असतानाही तीच्या तक्रारीची वेळीच योग्य दखल घेण्यात आलेली नाही. तक्रारीवर वेळीच दखल घेऊन कारवाई केली असती तर कदाचित ही दुःखद घटना टाळता आली असती.