पंढरपूर : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात असतानाच पंढरपूर मध्ये मात्र पोटनिवडणुकीच्या प्रचारसभांचा धुरळा उडाला आहे.
एका बाजूला राज्य मोठ्या संकटाशी सामना करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधताना सांगितलं आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाचा पुरता विसर पडल्याचं आता समोर येतंय.
पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे.
ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची बनली असून प्रचार सभांना देखील वेग आला आहे. एकीकडे राज्यात कोरोना वाढत असल्याने निर्बंध लावण्यात येत असताना राजकीय पक्षांना मात्र याचं भान नसल्याचं समोर येत आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचारसभेला सोशल डिस्टंसिंग, मास्क घालणे अशा कोरोना प्रतिबंधक नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
इतकेच नाही तर उपस्थितांसह राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी देखील मास्क काढून भाषण केलं. ‘सर्वांचे चेहरे बघितल्यावर कोरोना जगात नाही याची खात्री पटलेली आहे, म्हणून मीही मास्क काढून बोलतोय,’ असं बेजबाबदार वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- कोरोना नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा विचार करावाच लागेल, अजित पवारांचा इशारा
- लसीचे दोन डोस घेऊनही औरंगाबाद मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय कोरोना पॉझिटिव्ह
- सीएसकेसाठी धोनी जोरदार पुनरागमन करेल का? यावेळी आव्हान मोठे
- मे अखेरपर्यंत देशभरात कोरोनाचा हाहाकार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं सांगितलं ‘इतकी’ असेल रुग्णसंख्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

