टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पुन्हा एकदा काका पुतण्या वाद उफाळून येणार आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि खा, सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेटही घेतली आहे. त्यामुळे अवधूत तटकरे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितल जात आहे. तसेच शिवसेनेने देखील तटकरे यांना पक्ष प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दिल असल्याचं सांगितल जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अवधूत तटकरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येतीय. अवधूत तटकरे हे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाठी ग्रीन सिग्नल मिळाले असल्याचं सांगितल जात आहे. तर अवधूत तटकरे येत्या २ दिवसात निर्णय घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितल जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का असेल.
कोण आहेत अवधूत तटकरे?
आमदार अवधूत तटकरे हे तटकरे कुटुंबातील एक बडे प्रस्थ आहेत. रोह्याचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान आमदार, प्रशासन आणि पक्षात दबदबा असणारे आक्रमक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. यामुळे एकेकाळी सुनील तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून अवधूत यांची ओळख होती. त्यांच्या आक्रमक आणि राजकीय महत्त्वाकांक्षा हा सुनील तटकरे यांच्यासाठी कायमच अडचणीचा विषय ठरली आहे. सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर आमदारकी आपल्यालाच मिळाली पाहिजे, असा दावा करत अवधूत यांनी यांनी सुनील तटकरे यांनाच आव्हान दिले होते. यानंतर तटकरे काका पुतण्या मध्ये वाद सुरू झाल्याचे बोलले जाते आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

