Share

धनेगावात अवैध देशी-विदेशी दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Published On: 

बीड: कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. केवळ किराणा दुकाने व अत्यावश्यक दुकानेच सकाळच्या वेळेत चालू ठेवण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत दारूची दुकाने मात्र बंद आहेत. त्यामुळे अवैध पद्धतीने दारू विक्री सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील धनेगाव येथे कारवाई करत १ लाख ३८ हजाराची दारू जप्त केली आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊन असून सर्व दारूची दुकाने बंद आहेत. अशा वेळी मद्याची अवैधरीत्या विक्री होऊ नये याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवून आहेत. १९ मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत धनेगाव येथे पत्र्याच्या शेडमधून दारूचा साठा जप्त केला. बालाजी विठ्ठलराव कोथमिरे (रा. कळंब, जि. उस्मानाबाद) याने लॉकडाऊन कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा जमा केला होता.

यात व्हिस्कीचे १६ बॉक्स, देशी दारूचे ७ बॉक्स असा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या दारूची किंमत एक लाख ३८ हजार रुपये इतकी आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, औरंगाबाद येथील विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार व बीड येथील राज्य उत्पादन शुल्क अध्यक्ष नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. अवैध, बनावट, हातभट्टीची दारू व परराज्यातील दारू विक्री रोखण्यासाठी मोहिमा राबवण्यात येत आहेत. यापुढेही अशा कारवाया सुरू राहतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!