Share

सामायिक विहिरीतून पाणी घेतले म्हणून तरुणावर कोयत्याने वार

Published On: 

बीड: जिल्ह्यातील कोरेगाव येथे एका सामायिक विहिरीतून पाणी घेतल्याच्या कारणावरून एका तरुणावर झोपेत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला त्याच्याच चुलत भावाने इतर दोघांच्या मदतीने कोयत्याने हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी रात्री १२:३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी चुकत भाऊ व इतर दोघांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव येथील धनराज युवराज तांदळे (२२) व त्याचा चुलत भाऊ अविनाश बाबासाहेब तांदळे या दोघांची शेजारी शेतजमीन असून त्यांची सामायिक विहीर आहे. शेतीला पाणी देण्यासाठी विहिरीवरून सामायिक पाइपलाइन केलेली आहे, तर मागील सहा ते सात महिन्यांपासून अविनाश हा धनराज यास सामायिक पाइपलाइनमधून पाणी घेऊ देत नव्हता. अविनाशने १८ मे रोजी पाणी घेऊ देणार नाही असे म्हटल्याने धनराजने पाइपलाइन फोडली. धनराजसह त्यांचे कुटुंब झोपेत असताना २० मे रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास धनराजच्या तोंडावरील पांघरून ओढल्याने तो जागा झाला, तर अशोक विठ्ठलराव नेहरकर (रा. पिसेगाव), अविनाश बाबासाहेब तांदळे, बप्पा शामराव तोंडे (रा. सोनीमोहा, ता. धारूर) हे तिघे जवळ उभे असल्याचे त्याने पाहिले.

या वेळी अशोक नेहरकरने अविनाश तांदळे यांची पाइपलाइन का फोडलीस, तुला जिवे मारतो, असे म्हणत अशोक नेहरकरने कोयत्याने केलेला वार धनराजच्या कानावर व गालावर बसला. त्यानंतर अविनाश तांदळेने याला सोडू नको, जिवे मारून टाक, असे म्हणताच अशोकने पुन्हा एकदा कोयते मारून धनराजच्या डोक्यात वार केला. कोयत्याचे वार डाव्या हाताने अडवल्याने धनराजच्या हातालाही गंभीर दुखापत झाली, तर बप्पा तोंडे हा शिवीगाळ करत होता. रक्तस्राव होऊ लागल्याने धनराज हा घाबरून मोठ्याने ओरडल्याने त्याच्या शेजारी झोपलेले त्याचा भाऊ राम तांदळे व आतेभाऊ जगन्नाथ शामराव तोंडे हे दोघे जागे झाले. त्यानंतर डोक्यात व कानाजवळ झालेल्या जखमेतून रक्त येत असल्याचे पाहून ते तिघे जण तेथून पळून गेले, अशी फिर्याद धनराज तांदळे यांनी दिल्यावरून अशोक नेहरकर, अविनाश तांदळे, बप्पा तोंडे यांच्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला. फौजदार श्रीराम काळे हे पुढील तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!