बीड: “तुम्हाला अमुक रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे, तुम्ही तुमचे बँक डिटेल्स लगेच पाठवा”, “या नंबरवर आलेला ओटीपी पाठवा”, अशा अनेक प्रकारचे फोन येत असतात, काही लोकं शहाणी असतात मात्र काही अमिषाला बळी पडतात. असाच प्रकार झालाय बीडमध्ये, एका नोकरदार महिलेला ‘तुम्हाला कॅशबॅक आली आहे’ असे सांगत बँक खात्यातून भामट्याने ३५ हजार लांबवले आहेत. शिवाजीनगर ठाण्यात संबंधिताविरुद्ध फिर्याद नोंदवली असून, तपास सुरु आहे.
मोबाइलवरून संपर्क साधत नागरिकांना विविध आमिषे दाखवत ऑनलाइन रक्कम लांबवण्याचे प्रकार इतर शहरांप्रमाणेच बीडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शहरातील एका नोकरदार महिलेस ‘तुम्हाला कॅशबॅक आली आहे’ असे सांगत बँक डिटेल्स घेऊन परस्पर ३५ हजारांची रक्कम एका भामट्याने ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतली. मंगळवारी हा प्रकार घडला. आरोपीविरुद्ध आयटी अॅक्टसह चोरीचा गुन्हा नोंद झाला.
याबाबत शहरातील प्रणिता दिगंबर मेखले यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मनीष शर्मा नामक व्यक्तीने मेखलेंशी संपर्क करत ‘तुम्हाला कॅशबॅक आली आहे’ असे सांगत नंतर त्यांच्या खात्यातील ३५ हजारांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केली. खात्यातून रक्कम ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आल्यानंतर मेखले यांनी शिवाजीनगर ठाण्यात संबंधिताविरुद्ध फिर्याद नोंदवली. त्यावरून आरोपीविरुद्ध आयटी अॅक्टसह चोरीचा गुन्हा नोंद झाला. पो.नि.साईनाथ ठोंबरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सामायिक विहिरीतून पाणी घेतले म्हणून तरुणावर कोयत्याने वार
- ‘देशात संगणक युग, डिजिटल क्रांती आणण्याचे श्रेय स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नेतृत्व व दूरदृष्टीलाच’
- विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सिंधुदुर्गला औरंगाबादहून साडेसहाशे खांब रवाणा
- जालन्यात तिघांची म्युकरमायकोसीसवर मात!
- आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी कसोटी मालिकेचे वेळापत्रक बदलण्याची मागणी ? आता ईसीबीने हे निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

