देवगड : पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांना मोठा तडाखा दिला.महाराष्ट्रातील कोकणाला या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा दौरा करून नेमकी परिस्थिती समजावून घेतली. मात्र यावरून गेले दोन दिवस राज्यातील आघाडी सरकारमधील नेत्यांनी मोदींवर टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याकरिता आज कोकण दौऱ्यावर आहेत. अवघ्या काही तासातच हा दौरा संपणार असून केवळ दोन जिल्ह्यांचा केवळ धावता आढावा घेणार आहेत. कोणत्याही ठोस मदतीची घोषणा देखील केली नाही. आता याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांची अडचण झाली असून आता विरोधक सरकारला खिंडीत पकडू लागले आहेत.
दरम्यान, भाजपचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनीही कोकणातील परिस्थितीचा आढावा घेतला. देवगड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केल्या जात असलेल्या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?, आम्हीही असाच सवाल करायचा का? असा सवाल करतानाच गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही.
मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नका आणि प्रत्यक्ष टीका करत आहेत. मला राजकीय बोलायचं नाही. पण मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?, असा सवाल करतानाच पण मुख्यमंत्री आले हे ठिक आहे, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत, अशी देखील टीका फडणवीस यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘देशात संगणक युग, डिजिटल क्रांती आणण्याचे श्रेय स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नेतृत्व व दूरदृष्टीलाच’
- ‘मुंबईत झाडे पडून २ मृत्यू झाले आहेत, याला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे’
- अभिनेता सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘भूत पोलीस’ ओटीटी प्लटफॉर्मवर होणार प्रदर्शित
- ‘ONGC विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दोषींना जबाबदार ठरवून शिक्षा द्या’
- ‘फोटोसेशन नव्हे तर मदतीसाठी आलोय’, रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला


