बारामती : शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात वरिष्ठांना विश्वासात घेऊन काही सुधारणा करा. मी पाहणी करताना काही बारिक – सारिक चुका राहिल्या आहेत. त्या सुधारा. मला काय मी रात्री-अपरात्री किंवा पहाटे पाचलाच येऊन पाहत बसेल, मला सवय आहे. त्यावेळी रात्रीचे डॉक्टर जागे असले पाहिजेत, नर्सेस जाग्या असल्या पाहिजेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रशासनाची व डॉक्टरांची फिरकी घेतली.
बारामती येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये बसवण्यात आलेल्या सिटी स्कॅन मशिनचे उद्घाटन रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, मास्क वापरालाच पाहिजे. मी फक्त पाणी पिताना, जेवन करतानाच मास्क काढतो. माझं अनुकरण तुम्ही करावे यासाठी मी मास्क सातत्याने वापरत आहे. तिसरी लाट आली की आम्हाला नकोनको होते. मी हे पोटतिडकीने ऐवढ्यासाठी सांगत आहे की, कोरोना वाढला की आम्हाला विकास कामांचा सगळा निधी कोरोना उपाययोजनांमध्ये खर्च करावा लागतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.
शेवटी माणसाचा जीव वाचवणे हे प्रथम कर्तव्य आहे. आता लसीकरण मोठ्याप्रमाणात करण्यात येत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सलग ७५ तास लसीकरण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करण्यात आले. झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. काल पुणे येथील कोरोना आढावा बैठकीमध्ये देखील लसीकरणाचा सर्व्हे तसेच लसीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नितेशजी, सावध राहा! ‘हे’ लोक कधी तुमच्या घरात घुसतील कळणारही नाही’, मलिकांचा सूचक इशारा
- ‘एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा!’
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
- ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का?; नितेश राणे संतापले
- पलटवार! ‘एनसीबीने ज्याला सोडले तो राष्ट्रवादीच्याच जवळचा’; फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

