🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील पूरपरिस्थिती मुळे राजकारणाला सुरुवात झाली आहे. राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत आहे. मात्र विरोधक राज्यसरकारवर टीका करताना दिसत आहे.
जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सांगली आणि कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती नागपूरला घडली असती, तर मंत्री भाषणं देत फिरले असते का? असा खोचक सवाल चव्हाणांनी फडणवीसांना विचारला आहे. तसेच पुढे बोलताना ‘फडणवीस सरकारचा पश्चिम महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन आकसाचा आहे. त्यामुळेच महापुराकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले.’ असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे तेथे काही लक्ष द्यायची गरज नाही, हे बरोबर नाही. त्यामुळे सरकारने थोडं गांभीर्याने पाहायला हवं, असंही चव्हाण यांनी नमूद केलं.
दरम्यान, राज्यातील पूरपरिस्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्यांनी शिवसेना पक्ष आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात गुंतला आहे. त्यांना पूरग्रस्तांचं काहीही देणं-घेणं नाहीये अशा शब्दात आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष केले होते.
महत्वाच्या बातम्या
भाजप शिवसेनेला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय जनसंघर्ष थांबणार नाहीः अशोक चव्हाण
‘मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द करून, पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्याला भेट द्यावी’
‘पूरग्रस्तांना मदत करताना जाहिरातबाजी करणे हा अत्यंत घृणास्पद प्रकार’
ही तर शिवसेनेची जुनीच दुकानदारी- अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

