Share

‘मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द करून, पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्याला भेट द्यावी’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात गेले दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूर सदृश परिस्थिती आहे. तसेच कोल्हापूर , सांगली , मुंबई, ठाणे , पालघर या भागांमध्ये नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूरमध्ये तर जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ५० फूट ९  इंचांवर पोहोचली आहे. त्यामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशी सर्व विदारक परिस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजकीय दौऱ्यावर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपला दौरा स्थगित करुन तत्काळ कोल्हापूर जिल्ह्याला भेट द्यावी, आवाहन आ. हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून कोल्हापूरच्या पूर परिस्थिती बाबत आढावा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दौरा रद्द करून कोल्हापूरच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे अशी विनंती केली आहे. मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी, शिरोळ तालुक्यातील अनेक गावे ही पूर्णपणे पूराने वेढली गेली आहेत. ग्रामस्थांनी जनावरेही सोडून दिली आहेत. इथली परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने एनडीआरएफच्या जास्तीत जास्त तुकड्या आणि हेलिकॉप्टर्स तत्काळ येथे मदतीसाठी पाठवणे गरजेचे आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर आणखी गंभीर परिस्थिती ओढवू शकते, याची मला खात्री आहे. त्यामुळे लवकरात लवकर राज्य सरकारने मदत कार्य सुरु करावे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा स्थगित करून कोल्हापुरमध्ये लक्ष घालावे अशी विनंती केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाजनादेश यात्रेवर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही यात्रा अतिशय महत्वाची मानली जात आहे. या यात्रेवर मुख्यमंत्री फडणवीस गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेत आहेत. तर यात्रेद्वारे ते लोकांशी संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. त्यामुळे भाजप-सेना युतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत.

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज : फडणवीस

यात्रा सुरु होण्याआधीचं ‘शिवस्वराज्य यात्रे’त गटबाजी, यात्रेपासून आव्हाडांना दूर ठेवण्याचा प्रयत्न

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!