Share

“तू माझ्या समोर असतीस तर मी तुझं…”; ‘या’ अभिनेत्रीने केतकीला झापलं!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे  हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टमुळे राज्यात वातावरण तापलेलं आहे. सर्व पक्षांकडून केतकीच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला जात असताना पाहायला मिळत आहे. आता यावर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मालपेकर या केतकीला चांगलेचं झापत असताना दिसत आहेत.

सविता मालपेकर म्हणाल्या, “ते सगळं वाचल्यानंतर आणि पाहिल्यानंतर माझा संताप झाला आहे. कोण आहे ही केतकी, काय कतृत्व आहे तिचं. एखाद- दुसऱ्या मालिकेत काम केलं आणि मिळालेलं कामही टिकवता आलं नाही अशा मुलीने असं बोलावं? केतकी तू कोणत्या माणसाविषयी बोलतेस त्यांचं हिमालयाएवढं कतृत्व आहे. तू क्षुद्र आहेस तुझी लायकीही नाहीय. आता तू माझ्या समोर असतीस तर मी तुझं काय केलं असतं हे मला सांगता येत नाहीये”.

“याच्यापुढे जर तू असं काही बोललीस तसेच जे बोललीस ते शब्द तू मागे घेतले नाहीस आणि पवार साहेबांची माफी मागितली नाही, तर जिथे कुठे असशील तिथून शोधून काढून, पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही तर नावाची सविता मालपेकर नाही. तुझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा मी तुला पाठिशी घातलं होतं आणि तू चुकीची वागलीस तर मी तुला शिक्षाही करू शकते.”

तसेच, तुझा बोलविता धनी दुसराच कोणी आहे हे आम्हाला माहीत आहे. त्याचा तर आम्ही शोध घेऊच त्याआधी मुकाट्याने तूच सांग तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं. का असं वागता तुम्ही? तुमच्या अशा वागण्याने सिनेसृष्टीचं नाव खराब होतं हे कळत कसं नाही तुम्हाला? शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याबद्दल पुन्हा जर तू असं वागलीस तर तुझी खैर नाही हे लक्षात ठेव, असेही सविता मालपेकर म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!