Share

“केतकीचा मला अभिमान, कारण…”; सदाभाऊ खोत यांच्याकडून समर्थन!

Published On: 

उस्मानाबाद: अभिनेत्री केतकी चितळे  हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टमुळे राज्यात वातावरण तापलेलं आहे. सर्व पक्षांकडून केतकीच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला जात असताना आता सदाभाऊ खोत यांनी मात्र तिला समर्थन दिलेलं आहे. रयत क्रांती संघटनेनं केतकीनं केलेल्या पोस्टचं समर्थन केलं आहे. त्यामुळे हा वाद शिगेला पोहचण्याची शक्यता आहे.

“केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा प्रस्थापितांविरोधात आहे”, असं सदाभाऊ खोत म्हणाले. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“सरकार पुरस्कृत दहशतवाद राज्यात वाढवता कशाला? देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वेगळा शब्द वापरुन टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती? अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हतं का? स्वत:वर टीका केली की सगळं आठवतं”, असा जोरदार हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!