Share

पुतळे जाळायचे असतील तर ‘बेटी बचाव बेटी पटाव’ म्हणणाऱ्यांचे जाळा; नाना पटोलेंची भाजपवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. अगोदर ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरून वादंग उठले असतानाच त्यांनी पुन्हा एकदा ‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं’ असे म्हटले आहे. आता यावरूनच भाजपकडून त्यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन केले जात आहे.

दरम्यान या वक्तव्यावरही त्यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. एका गावगुंडाचं भाजप इतकं समर्थन का करत आहे? भाजपला जाळायचे असतील तर बेटी बचाव बेटी पटाव म्हणणाऱ्यांचे जाळा. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर, ‘काँग्रेस नेहमी गावगुंडाविरोधात राहणार. ते त्याचा अर्थ काय लावत असतील तो त्यांचा प्रश्न आहे. माझे पुतळे जाळण्याची, उद्धार करण्याची प्रक्रिया किती दिवस सुरु ठेवायची ते ठेवावं. पोलीस यासंबंधी कारवाई करतील. पण राज्यात कोरोनाची स्थिती असतानाही आंदोलन कशाला? गावगुंडासाठी इतकं प्रेम का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान भाजपने जो न्याय नारायण राणेंसाठी होता तोच नाना पटोले यांच्यासाठी असावा, अशी मागणी केली आहे. यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणेंचं आणि माझं वक्तव्य काय होतं? मी प्रधानमंत्र्यांविरोधात बोललो नसून गावगुंडाबाबत बोललो. तो गावगुंड समोर आला असताना बालहट्ट कशासाठी? भाजपकडून मूळ प्रश्नापासून लोकांना दूर नेलं जात आहे. सुसंस्कृत पक्षाचे लोक आहात तर मग महिला, मुलींचा अपमान करणाऱ्यांना काही बोलणार नाही का? आत कुठे गेली अक्कल? असा संतप्त सवालही नाना पटोले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!