🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत हे नेहमीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आठवणीतले किस्से सांगत राहतात. आज देखील ‘सामना’ रोखठोक मधून त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी नोकरशहांबद्दल केलेल्या विधानाचा संदर्भ घेत राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हा किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले आहेत की,’शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात वादळ निर्माण केले. राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता येणार असे वातावरण निर्माण झाले. पत्रकारांनी एकदा बाळासाहेबांना विचारले, ‘तुमचा मुख्यमंत्री कसा हवा?’ बाळासाहेबांनी क्षणाचाही विचार न करता सांगितले, ‘कसा म्हणजे? बॅ. अंतुलेंसारखा!’. बॅ. अंतुले यांनी लालफितशाहीच मोडून काढली होती. सामान्यांची कामे लालफितशाहीत अडकू नयेत अशी त्यांची भूमिका होती. लोकांनी निवडून दिलेल्या लोकांनीच चालवावे आणि नोकरशहांनी फक्त हुकूम पाळावेत, हे त्यांचे धोरण होते. आज नोकरशहा निवडून आलेल्यांना हुकूम देतात व आपल्याच सरकारची माहिती विरोधी पक्षाला देतात. म्हणून प्रशासनावरील मांड घट्ट हवी. उमा भारती यांनी जे सांगितले ते अगदीच चुकीचे नाही’, असेही ते म्हणाले.
दरम्यान, ‘नोकरशहा आमच्या चपला उचलतात,’ असे वक्तव्य उमा भारती यांनी केले. याविषयी बोलतांना राऊत म्हणाले की,’उमा भारती या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. केंद्रातही त्यांनी काम केले. आज त्या कोठेच नाहीत, पण नोकरशहा व राज्यकर्त्यांचा झगडा जुना आहे. मंत्रिमंडळे, मुख्यमंत्री येत-जात असतात. आम्ही कायम असतो हा नोकरशहांचा अहंकार आहे. लालफितशाही गोरगरीबांचा गळा घोटत असते, पण स्वतःच्या घरासाठी चांगले भूखंड लालफित ढिली करून सोडवत असते. हे मुंबई-महाराष्ट्रातही अनेकदा घडले आहे. नोकरशहा येणाऱ्या सरकारसमोर झुकत असतात, हे सत्यच आहे’ असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ पत्रामुळे चंद्रकांतदादांचंच धोतर सुटलंय; चंद्रकांत पाटील राऊतांच्या निशाण्यावर
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला
- भाजप आमदाराची वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
