मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपा यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ रोखठोकमधून भाजपावर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर सातत्याने खोचक टीका सुरूच ठेवली आहे. त्यामुळे राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांविषयीच्या विधानावरून राऊतांनी पाटील यांच्यावर टोलेबाजी केली आहे.
काही दिवसांपूर्वी पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस असे १०० अजित पवार खिशात घेऊन फिरतात’, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यावरून आता राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की,’पाटील म्हणतात शंभर अजित पवार घेऊन देवेंद्र फडणवीस फिरात. हे विधान गंमतीचंच आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या ७२ तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तिथे शंभर अजित पवार भाजपाला कसे झेपणार? पण श्री पाटील यांनी महाराष्ट्राचं मनोरंजन करायचं ठरवलंच असेल, तर त्यांना कोण थांबवणार?’ असा सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, ईडीच्या कारवायांवरून देखील राऊत यांनी टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले की,’ईडीच्या नावे धमक्या द्यायच्या आणि चिखलफेक करायची हेच चंद्रकांत पाटील यांचं काम. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांना टीका सहन करावीच लागते. वागताना, बोलताना तारतम्य ठेवावं लागतं. सामनातल्या एका अग्रलेखावर पाटील यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र पाठवलं. त्यात भूमिका कमी आणि जळफळाट जास्त आहे. लिहिताना, बोलताना भान सुटलं की स्वत:च्याच धोतरात लोक कसे पाय अडकून पडतात ते या पत्रावरून दिसतं’.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला’ राऊतांची भाजपवर टोलेबाजी
- कोल्हापुरात महापुराचा एक थेंबही महामार्गावर येणार नाही; गडकरींचा शब्द
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

