Share

भाजप आमदाराची वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

Published On: 

पुणे : पुण्यातील भाजपचे पुणे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत केलेली शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

संबंधित महिला अधिकारी ह्या महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेता त्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला अगदी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केल्याचे ऑडिओ क्लीपमधून समोर आलं आहे.

संबंधित महिला अधिकाऱ्याने फोन कार्यकर्त्यांच्या हातात दिला. त्यावर कांबळे यांनी कार्यकर्त्याला फोन स्पिकरवर ठेवायला सांगुन पुन्हा एकदा अर्वाच्च भाषेत शिवागीळ केली. तसेच काही पुरुष अधिकाऱ्यांचे नाव घेत त्यांच्याही नावे शिवीगाळ करीत त्यांना धमकावले. या मोबाईल रेकॉर्डिंगचे संभाषण आता व्हायरल झाले असून कांबळे यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

एकीकडे महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारच्या नावे बोंब मारत आहेत.भाजपच्या महिला आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधले होते. असे असताना दुसरीकडे भाजपचेच आमदार मात्र महिलांना अशा भाषेत बोलत असल्याचे प्रकरण समोर आल्याने भाजपची मोठी अडचण झाली आहे. आता या प्रकरणी भाजपचे नेते आमदार कांबळे यांच्यावर काय कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!