मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यातील शाब्दिक युद्ध अद्यापही थांबलेलं नाही. दोन्ही नेते एकमेकांवर रोज काही ना काही मिष्किल टोलेबाजी करताना दिसतात. आज संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर सामानाच्या रोखठोकमधून जोरदार हल्ला केला आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला पत्रं लिहिलं, त्यामुळे त्यांचंच धोतर सुटलंय. महाराष्ट्रातील विरोधकांनी हास्यजत्रा करून ठेवली आहे. आणखी किती मनोरंजन कराल? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
‘सामना’तील एका अग्रलेखावर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आणि एक खरमरीत पत्र ‘सामना’ला पाठवले होते. त्यात भूमिका कमी आणि जळफळाटच जास्त. तरीही ते पत्र ‘सामना’ने जसेच्या तसे छापले. त्या पत्रात पाटील यांनी अनेक ठिकाणी अपमानकारक, अब्रुनुकसानी करणारी विधाने करूनही ते सर्व प्रसिद्ध करण्याचे मोठेपण ‘सामना’ने दाखवले, पण लिहिता, बोलताना भान सुटले की स्वतःच्याच धोतरात लोक कसे पाय अडपून पडतात ते या पत्रावरून दिसते. पत्रकार सुर्वे यांनी चंद्रकांत पाटलांच्या पत्रातील हास्यजत्रा समोर आणली. त्यामुळे त्यांचेच धोतर सुटले. आता धोतरावर कुणी बोलले म्हणून हिंदू धर्माचा अपमान झाल्याची बोंब भाजप आमदारांकडून ठोकली गेली, पण देशातील अनेक इस्लामी देशातही लुंगीवजा धोतरे वापरली जात आहेत. ते एक वस्त्र आहे. गाय हा ज्याप्रमाणे एक उपयुक्त पशू आहे असे वीर सावरकर सांगून गेले तसे ‘धोतर’, ‘धोती’ हे एक वस्त्रच आहे, असं संजय राऊत सामनामध्ये म्हणाले आहेत.
ईडीच्या नावे धमक्या द्यायच्या आणि चिखलफेक करायची हेच चंद्रकांत पाटील यांचं काम. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांना टीका सहन करावीच लागते. वागताना, बोलताना तारतम्य ठेवावं लागतं. सामनातल्या एका अग्रलेखावर पाटील यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र पाठवलं. त्यात भूमिका कमी आणि जळफळाट जास्त आहे. लिहिताना, बोलताना भान सुटलं की स्वत:च्याच धोतरात लोक कसे पाय अडकून पडतात ते या पत्रावरून दिसतं, असं राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला’ राऊतांची भाजपवर टोलेबाजी
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
