🕒 1 min read
जम्मू-काश्मीर : मंगळवारी(५ सप्टें.) जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि बंदिपुरा जिल्ह्यामध्ये माखनलाल बिंद्रू या काश्मिरी पंडितसह तीन नागरिकांची दहशदवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्यांची मुलगी श्रद्धा बिंद्रूने वडिलांची गोळी घालून हत्या करणाऱ्यांना चर्चेचे आव्हान दिले आहे.
प्रसार माध्यमांशी यासंदर्भात बोलतांना श्रद्धा म्हणाली की,’माझे वडील जरी मरण पावले असतील, पण त्यांचा आत्मा सदैव जिवंत राहील. माझे वडील एक सेनानी होते आणि ते नेहमी म्हणायचे की मी माझ्या पायात बुटांसह मरणार’. तसेच ‘तुम्ही एका व्यक्तीला मारू शकता, परंतु तुम्ही माखनलालच्या आत्म्याला मारू शकत नाही. ज्याने माझ्या वडिलांना गोळ्या घातल्या, त्याने माझ्या समोर यावं. माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिले, तर राजकारण्यांनी तुमच्या हातात बंदुका आणि दगड दिले. तुम्हाला बंदुका आणि दगडांनी लढायचे आहे? असा सवाल करत हा भ्याडपणा आहे. सर्व राजकारणी तुमचा वापर करत आहेत, या आणि शिक्षणाने लढा द्या’ असेही ती म्हणाली.
“My father Makhan Lal Bindroo a Kashmiri Pandit will never die. You can just kill the body and he will be alive in the spirit,” says Dr Shraddha Bindroo. #srinagar #Kashmir pic.twitter.com/Ai938ty2wP
— Parvaiz Ahmad Qadri (@Parvaiz_Qadri) October 6, 2021
दरम्यान, पुढे बोलत असतांना ती म्हणाली की,’मी एक सहाय्यक प्राध्यापक आहे. मी शून्यापासून सुरुवात केली; माझ्या वडिलांनी सायकलवरून कामाला सुरुवात केली, माझा भाऊ एक प्रसिद्ध मधुमेह तज्ञ आहे, माझी आई मेडिकलमध्ये बसते. आम्ही आज जे आहोत ते आम्हाला माखनलाल बिंद्रूंनी बनवले. माझे वडील एक काश्मिरी पंडित होते, ते कधीही मरणार नाही. हिंदू असूनही मी कुराण वाचले आहे. कुराण म्हणते की तुम्ही शरीराला मारू शकता, आत्मा जिवंत राहू शकतो. माखनलाल बिंद्रू आत्म्याने कायम जिवंत राहील.’
महत्वाच्या बातम्या:
- देगलुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत वंचितची एन्ट्री; आंबेडकरांकडून विश्वासू सहकाऱ्याला तिकीट
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘महागाईने जनता हैराण झालेली असतानाही मोदी सरकारला जनतेच्या यातना दिसत नाहीत’
- ‘तुझ्यात जीव..’फेम हार्दिक जोशी मालिकेपूर्वी करायचा ‘हे’ काम
- भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

