Share

भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई   – भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते. यापुढील निवडणुकांमध्येदेखील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालात ८५ जागांपैकी जवळपास ४८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १९ जागा जिंकल्या असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

आज राज्यातील ६ जिल्हयांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मधील पोटनिवडणूकांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात महाविकास आघाडीने विकास कामातून जनता सोबत असल्याचे सिध्द केले आहे असे पाटील म्हणाले. दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!