Share

‘महागाईने जनता हैराण झालेली असतानाही मोदी सरकारला जनतेच्या यातना दिसत नाहीत’

Published On: 

🕒 1 min read

पुणे –  बहोत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार अशी धूळफेक करत भाजपने केंद्रात सत्ता मिळवली. सत्तेत आल्यानंतर मात्र केवळ धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या सेवेत मोदी सरकार व्यस्त झाले. इकडे प्रचंड महागाईने जनता हैराण झालेली असतानाही मोदी सरकारला जनतेच्या यातना दिसत नाहीत असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला .

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण पुणे शहरातील आठही विधानसभा क्षेत्रात महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या या कारभाराचा व वाढलेल्या प्रचंड महागाईचा निषेध करण्यासाठी आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवाजीनगर येथे सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली,तर कॅन्टोमेंटमधील आंदोलनात सिलेंडरला हार घालून त्याची पूजा करण्यात आली.

प्रसंगी आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवाजीनगर, कसबा व कॅन्टोमेंट येथे हजर राहत आपल्या भाषणात बोलतांना त्यांनी गेल्या ७ वर्षांच्या कालावधीत देशाचा कारभार सांभाळताना सर्वसामान्य नागरिकांना उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असून याचं कारण म्हणजे दैनदिन गरजेच्या वस्तूंमध्ये झालेली भरमसाठ वाढ अश्या परिस्थिती मध्ये मी देशाच्या पंतप्रधानांना विचारू इच्छितो की  मोदीजी या महागाईमध्ये सर्वसामान्यांनी जगायचं तरी कसं..? असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!